जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२२ । जळगाव जिल्ह्यासह ग्रामीण भागात अवैध गुरांची मोठया प्रमाणात वाहतूक होत असल्याचे प्रमाण वाढले आहे. आज सकाळी रावेर पोलिसांनी पुन्हा निर्दयीपणे गुरांना कोंबून वाहतूक करणारा ट्रक पकडला आहे. यात सुमारे २५ गुरांची सुटका करण्यात आली असून सर्व गुरांना गौ-शाळेत रवाना केले आहे. दरम्यान, ट्रक चालक फरार झाला आहे.

रावेर पोलिसांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हा ट्रक पकडला आहे. येथील नागरिकांना ट्रक (क्र.एमएच १८ बिजी ३६८३) यावर संशय आल्याने ट्रक थांबवला. दरम्यान, यात २५ गुरांना निर्दयीपणे भरुन घेऊन जात असल्याचे उघडीस आले. त्यांनतर सहायक पोलीस निरिक्षक शितलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनावरुन पोलीस कर्मचारी मुकेश सोनवणे, विशाल पाटील, अमोल जाधव यांनी सुमारे २५ गुरांची सुटका केली आहे. दरम्यान, ट्रक व गुरे असे एकूण ६ लाख १८ हजाराचे पशुधन रावेर पोलिसांनी जप्त केले असून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.













