महाराष्ट्रातील रेशनकार्डधारकांना दिवाळीनिमित्त 100 रुपयांत ‘या’ चार वस्तू मिळणार

ऑक्टोबर 4, 2022 5:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२२ । येत्या काही दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला आहे. दिवाळीआधीच शिंदे -फडणवीस सरकारने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ 100 रुपयात देण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

ration card

या संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रति १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल याचा समावेश असेल. राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे ७ कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्वारे करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण 513 कोटी 24 लाख खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

सदरहू शिधावस्तूंचा संच दिवाळीपूर्वी वाटप व्हावा, त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now