महाराष्ट्रराजकारण

अखेर तिढा सुटला! नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन, तर रायगडची धुरा भरत गोगावले यांच्याकडे!

जळगाव लाईव्ह न्यूज । मागच्या अनेक महिन्यापासून सुरु असलेला नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे.नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर रायगडच्या पालकमंत्रिपदी शिंदें गटाचे नेते भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे

girish mahajan 1 jpg webp

नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी सुरू असलेल्या चर्चेनंतर गिरीश महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे गिरीश महाजन हे नाशिकचे नवे पालकमंत्री असणार आहेत. नाशिकमध्ये आगामी काळात कुंभमेळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर सोपवण्यात आली असून, त्यांची ‘कुंभ मंत्री’ म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे. आता नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली आहे.

दुसरीकडे रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी अजित पवार गटाच्या नेत्या आदिती तटकरे आणि शिंदे गटाचे भरत गोगावले यांच्यात स्पर्धा होती. दोन्ही गटांकडून पालकमंत्रिपदावर दावा करण्यात आल्याने गेल्या काही दिवसांपासून या नियुक्तीचा निर्णय रखडला होता. अखेर सरकारने भरत गोगावले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

विशेष म्हणजे, १५ ऑगस्ट रोजी रायगडमध्ये भरत गोगावले यांनीच ध्वजारोहण केले होते. त्यावेळी त्यांनी रायगडचे पालकमंत्री होण्याचे संकेत दिले होते. आता त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्याने त्यांचा दावा खरा ठरला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button