⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

रानडुकरांसाठी लावला ट्रप अन् अडकला बिबट्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२२ । रानडुकरांनी अनेक भागात धुमाकूळ घातलीय, यामुळे त्रस्त झालेले नागरिक आळा घालण्यासाठी विविध प्रयत्न करत आहेत. अमळनेर तालुक्यातील खापरखेडा येथील नागरिकांनी देखील डुकरांसाठी सापळा रचला मात्र, त्यात डुक्कर न फसता चक्क बिबट्या अडकला आणि त्याला पाहायला गेलेल्या नागरिकांवर हल्ला चढवत जखमी केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या हल्ल्या एक इसम जखमी झाला आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

रुपसिंग शंकर बारेला (वय ४४) असे जखमी इसमाचे नाव आहे. त्याच्यावर पातोंडा आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून त्याला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान वनविभागाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली असता. बिबट्याचे ठसे आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खापरखेडा शिवारात काल सोमवारी दुपारी च्या रूमारास काही नागरिकांनी डुकरांच्या शिकारीसाठी आले होते.

एन डी पाटील आणि प्रमोद पाटील यांच्या शेता दरम्यान, डुकरांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या सापळ्यात बिबट्या अडकला होता. त्याचवेळी तेथे रुपसिंग शंकर बारेला पोहचले. त्यांना जाळ्यात बिबट्या अडकल्याचे दिसले. त्याच वेळी बिबट्याने बारेला सह आणखी एका इसमावर हल्ला केला. यात रुपसिंग बारेला हाताचे लचके तोडले.