⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 12, 2024
Home | जळगाव जिल्हा | नाथाभाऊंचा भाजप प्रवेश रखडला; रक्षा खडसे म्हणाल्या, मी एवढी मोठी नाही की..

नाथाभाऊंचा भाजप प्रवेश रखडला; रक्षा खडसे म्हणाल्या, मी एवढी मोठी नाही की..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२४ । लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीचे शरद गटाची साथ सोडून एकनाथ खडसेंनी भाजपात वापसीचे संकेत दिले होते. मात्र अद्याप त्यांचा भाजप प्रवेश झाला नाहीय. त्यांचा भाजप प्रवेश कधी होणार याकडे लक्ष लागले असताना एकनाथ खडसे यांची सून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंनी नाथाभाऊंच्या रखडलेल्या भाजप प्रवेशावर मत मांडले आहे

काय म्हणाल्या रक्षा खडसे?
एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबतचा निर्णय हा वरिष्ठ पातळीचा असून याबाबतीत वरिष्ठ निर्णय घेतील. मी एवढी मोठी नाही की मी याबद्दल बोलू शकेल. आजही माझी इच्छा आहे की गिरीश महाजन व नाथाभाऊ यांनी एकत्र आले पाहिजे. दोघांनी एकत्र येऊन जिल्ह्याच्या विकासासाठी काम केल्यास नक्कीच चांगले राहील; असे मत रक्षा खडसे यांनी व्यक्त केले आहे.

स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या वतीने खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन या उपक्रम अंतर्गत आयोजित मुल्याकंन शिबीराच्या उदघाटन निमित्ताने रक्षा खडसे या जळगावात आल्या होत्या. यावेळी एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्या बोलत होत्या. तसेच एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे व्यक्तिगत मत ते चांगले मांडू शकतील; असेही त्या म्हणाल्या.

लोकसभेच्या माझ्या विजयामध्ये एकनाथ खडसे यांचा मोठा वाटा होता. केंद्राच्या नेत्यांकडून मला लोकसभेत सहकार्य करा, असं नाथाभाऊना सांगण्यात आलं होतं. त्यानुसार त्यांनी मदत देखील केली आहे. पण एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबतचा निर्णय हा वरिष्ठ पातळीचा असून याबाबतीत वरिष्ठ निर्णय घेतील. पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत हा विषय गेला असून यासंदर्भात लवकरच निर्णय होईल; असे देखील रक्षा खडसे यांनी स्पष्ट केले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.