नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाबाबत रक्षा खडसेंचं मोठं विधान ; काय म्हणाल्या वाचा..

ऑगस्ट 4, 2024 6:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२४ । लोकसभा निवडणुकीपूर्वीच ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. परंतु अद्यापही एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश झालेला नाहीये. नाथाभाऊ यांचा भाजप प्रवेश नेमका कधी होणार, असा प्रश्न अनेकांना पडलाय. अशातच नाथाभाऊंची सून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसें यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत मोठं विधान केलं असून ते कधी भाजपमध्ये येतील याची माहिती दिलीय.

raksha khadse jpg webp

एकनाथ खडसे भाजपमध्ये कधी प्रवेश करणार या प्रश्न देतांना त्या म्हणाल्या. नाथाभाऊ हे मागच्या काळापासून सक्रिय झालेत, त्यामुळे लवकरच पक्षश्रेष्ठी नाथाभाऊबद्दल निर्णय घेतील, असं मला विश्वास आहे.दरम्यान मागे एका महिन्याआधी एकनाथ खडसे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यावेळी रावेरच्या खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेही त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. या भेटीनंतर एकनाथ खडसे यांनी माझा अनौपचारिक भाजप प्रवेश झाल्याचे सूचक विधानही केलं होतं.

नंदुरबार जिल्ह्याच्या कन्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे या मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आल्या. यावेळेस भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक मंत्री खडसे यांनी घेतली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्याची जबाबदारी मंत्री खडसे यांच्यावर सोपवण्यात आलीय. येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आदेश मंत्री रक्षा खडसे यांनी दिलेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now