⁠ 
सोमवार, डिसेंबर 2, 2024
Home | जळगाव जिल्हा | प्रभू श्रीरामा, दररोज मिळणारे जनतेवरील प्रेम अखंड राहू दे…

प्रभू श्रीरामा, दररोज मिळणारे जनतेवरील प्रेम अखंड राहू दे…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आ. राजूमामा भोळेंचे चिमुकले राम मंदिरात साकडे, गांधी नगर, गणेश नगर भागात काढली रॅली

जळगाव लाईव्ह न्यूज । प्रभू श्रीरामा, दशकातील विकासाची परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी बळ दे, नागरिकांचे माझ्यावरील आशीर्वाद कायम असू दे…जळगावला विकास पर्व कायम ठेवण्यासाठी विजयश्री तर हवीच, मात्र दररोज मिळणारे जनतेवरील प्रेम अखंड राहू दे… अशा शब्दात जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी प्रार्थना करून नविन बसस्थानक समोर प्राचीन चिमुकले श्रीराम मंदिर येथे आशीर्वाद घेतले.

आ. राजूमामा भोळे यांनी सोमवारी दुपारी चिमुकले श्रीराम मंदिर येथे दर्शन घेत प्रचार रॅलीला प्रारंभ केला. तेथून भजे गल्ली, गांधी नगर, ओंकार नगर, पांडे डेअरी चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, गणेश नगर परिसर, डॉ. आंबेडकर मार्केट मार्गे पंचमुखी हनुमान मंदिर येथे समारोप करण्यात आला. रॅली मार्गात रामदासदादा भंगाळे, प्रकाश भंगाळे, भागवतदादा भंगाळे, खा. स्मिता वाघ, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. ए.जी.भंगाळे, माजी नगराध्यक्ष बंडूदादा काळे, केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी सुनील भंगाळे, ॲड. राजेश झाल्टे यांच्या घरी सदिच्छापर भेटी देऊन शुभाशीर्वाद घेतले.

रॅलीत माजी नगरसेवक अमित काळे, ॲड. शुचिता हाडा, जितेंद्र मराठे, डॉ. वीरेन खडके, मंडळ क्र. ४ चे अध्यक्ष मनोज काळे, माजी नगराध्यक्ष बंडूदादा काळे, अशोक राणे, शरद खडके, राजेंद्र काळे, दत्तू भावसार, हेमंत भंगाळे, सतीश पाटील, संजय अडकमोल, चेतन तायडे, सचिन तायडे, राजश्री वर्मा, रुपाली गांधी, शिवसेनेचे माजी नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे, कुंदन काळे, हर्षल मावळे, उमेश सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे विनोद देशमुख, मीनल पाटील, अर्चना कदम, ममता तडवी, जयश्री पाटील, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू मोरे, महानगराध्यक्ष कल्पेश मोरे, विकी बागुल, सिद्धांत मोरे, बाबा म्हसदे, केतन वाणी, नारायण सपकाळे, रिपाई (आठवले) पक्षाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, मिलिंद अडकमोल, प्रताप बनसोडे, अविनाश पारधे, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, अशोक पारधे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.