‘सावद्याचा राजू’ एका कुटुंबासाठी मागतोय मदत : तुम्ही करणार का?
जळगाव लाईव्ह न्युज । दीपक श्रावगे । सावदा येथून जवळच असलेल्या वाघोदा खुर्द गावात एक दलीत कुटुंबाला भर पावसात अतिक्रमित जागा 8 दिवसात खाली करण्याची नोटीस येथील ग्रामपंचायतीने दिली आहे. यावेळी गावातील राजू पटेल नामक एका युवकाने एक व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
यात त्याने या कुटुंबाची व्यथा मांडली आहे. गावातील इतर मोठी अतिक्रमणे काढत नाही पण या गरीब कुटुंबास मात्र घर खाली करण्याची नोटीस देत आहेत असे म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये घर खाली न केल्यास पोलीस बंदोबस्तात ते खाली करून जागा मोकळी करण्यात येईल. आशयाची नोटीस दिल्याने युवकाने अतिशय संतप्त भावना व्यक्त केली आहे.
आधी गावातील इतर अतिक्रमण काढण्याची हिंमत दाखवा असा सवाल केला असून नाहक गावाबाहेर राहणाऱ्या गरीब कुटुंबास त्रास देऊ नका अशी विनंती करीत सर्व पक्षाचे नेत्यांनी देखील याकडे लक्ष द्यावे असे आवाहन देखील केले आहे. याच राजू पटेल नामक युवकाने 3 वर्षापुर्वी याच गावात रेशन मधील होणार भ्रष्टाचार सोशल मीडियावर व्हायरल करून संपूर्ण राज्यात पोहचविला होता. त्यावेळी देखील नागरिकांना या माध्यमातून न्याय मिळाला आता देखील असाच न्याय या कुटुंबास मिळावा अशी अपेक्षा देखील त्याने या व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे.