जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२२ । रायसोनी इस्टीट्यूट येथील प्रा. सौरभ गुप्ता यांना नुकतीच गीतम विश्वविद्यालय, विशाखापट्टणम येथून “पर्फोर्मन्स असिसमेंट ऑफ रूम एअर कंडीशनर विथ द हायड्रोकार्बन गॅस” या विषयात पीएचडी प्रदान करण्यात आली.
जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिसिनेस मॅनेजमेंट येथे रिसर्च ऑन्ड डेव्हलपमेट विभागाचे अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहे. त्यांनी “एसीतून निघणारा गॅस पर्यावरणाला घातक ठरू नये” या विषयावर सखोल संशोधन करून प्रबंध सादर केला. मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. पी. श्रीनिवास यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व ऑरकडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.