जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२२ । ज्येष्ठ गायिका व भारतरत्न स्वर्गीय लतादीदींना रायसोनी महाविद्यालयातर्फे सोमवारी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

महाविद्यालयातील म्युझिक क्लबच्या वतीने दिवसभर लतादीदींचे गाणी सुरू ठेवून महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा.डॉ. प्रणव चरखा यांच्यासह विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संचालिका प्रा.डॉ. प्रिती अग्रवाल यांनी प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींसाठी त्यांनी गाणं गायले. स्वातंत्र्यदिन असो की, सकाळी उठल्यावर देवाची आरती, मंदिरात गेल्यावर कानावर पडणारे सुर असो त्यांनी त्याला शब्दबद्ध करत गायले. अकॅडमिक डीन प्रा.डॉ. प्रणव चरखा यांनी संगीत जगतातील एका युगाचा अंत झाला. त्यांच्या सुरांमधून येणाऱ्या आठवणी युगानुयुगे कायम राहतील असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी रायसोनी इस्टीट्युटचे जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील व प्रा.राहुल त्रिवेदी यांनी सहकार्य केले. श्रद्धांजली कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कौतुक केले.
हे देखील वाचा :
- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
- ज्वारी, मका, बाजरीला सरकारचा हमीभाव; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १८ ठिकाणी खरेदी केंद्रे..
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल






