⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

पावसाळा आला रे : जळगावसह परिसरात विजांचा लखलखाट

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२२ । मागील काही दिवसापासून मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्रातील सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 10 जून रोजी नैऋत्य मान्सून कोकणात दाखल झाला आहे.यामुळे आता हा पाऊस लवकरच जळगाव जिल्ह्यात येईल यात वाद नाही. यामुळे जळगावसह परिसरात विजांचा लखलखाट सुरु झाली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून लवकरच पाऊस येईल अशी आस आहे.

त्यामुळे (Kharif Season) खरिपाच्या पेरणीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून पुढील आठवड्यापर्यंत मान्सून पू्र्ण क्षमतेने दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह सोमवारी सायंकाळी ४ वाजता जाेरदार पावसाने हजेरी लावली. पेरणीची कामे सुरू झालेली असतानाच पाऊस पडल्याने येथील शेतकरी सुखावून गेला आहे.

दरम्यान, मागच्या वर्षी मान्सून 7 जूनला तळकोकणात दाखल झाला होता. तर यावर्षी महाराष्ट्रात यायला मान्सूनला तीन दिवस उशीर झाला आहे. यंदा 29 मे रोजीच केरळात आगमन झालेल्या मान्सूनचा पुढे प्रवास खडतर झाल्याने राज्यात मान्सूनचे आगमन होण्यास उशिर झाला होता. आगमनानंतर दोनच दिवसांमध्ये केरळ राज्य आणि कर्नाटक किनारपट्टी व्यापून टाकल्याने राज्यातही दणक्यात आगमन होणार असे वाटत असतानाच मान्सूनचा वेग मंदावला होता. गेल्या आठवड्याभरापासून अरबी समुद्रापासून मान्सूनची प्रगती झाली नव्हती. त्यामुळे राज्यात मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले होते.