⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

अखेर हवामान खात्याचा अंदाज खरं ठरला ! जळगावसह राज्यात दमदार पावसाची हजेरी ; शेतकऱ्यांना दिलासा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२२ । हवामान खात्याने सोमवारपासून राज्यात पाऊस सक्रीय होणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार राज्यातील बहुतांश भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जळगाव जिल्ह्यात देखील रात्री पावसाने हजेरी लावली. सकाळपासून पावसाची अद्यापही संततधार सुरूच होती. दरम्यान, जिल्ह्यात बुधवारपासून पावसाचा जाेर वाढण्याची शक्यता आहे.

राज्यात (Monsoon) मान्सूनचे आगमन होऊन महिना उलटला तरी सर्वत्र पाऊस हा सक्रीय झालेला नव्हता. त्यामुळे (Kharif Season) खरीप हंगामाबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, जुलै महिन्यात चित्र बदलेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. कालपासून दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा “ऑरेंज अलर्ट” (orange alert in Konkan) देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणामध्ये कालपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

दरम्यान, हवामान खात्याने सोमवारपासून राज्यात पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात देखील सोमवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात बुधवारपासून पावसाचा जाेर वाढण्याची शक्यता आहे. पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून दुबार पेरणीचे संकट टळलं आहे. पेरणीनंतर पावसाने उघड दिली होती तर काही भागात पेरणीयोग्य पाऊस झाला नव्हता. पण आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून दुबार पेरणीचे संकट टळलं आहे.