जळगाव जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

जुलै 24, 2022 12:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२२ । हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यात पुन्हा पुढचे चार दिवस मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्यमहाराष्ट्र, पूर्व विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच आज उत्तर महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात आज रविवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

rain 2 jpg webp

जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने मागच्या काही दिवसांत थोडी उसंत दिली होती.(Maharashtra rain) परंतु राज्यात पुन्हा पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. कोकण, मध्यमहाराष्ट्र, पूर्व विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

रात्री जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. आज रविवारी जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. गेल्या २३ दिवसांत जिल्ह्यात जुलैतील सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. या महिन्यात १९७.९ मिलिमीटर पावसाची नाेंद झाली. जुलैत जिल्ह्यात १८९.२ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताे; परंतु यंदा जुलैत गेल्या २३ दिवसांत १७ दिवस पावसाचे राहिले आहेत.

पुढील दाेन महिन्यांत चांगले पर्जन्यमान अपेक्षित असल्याने गेल्या दाेन वर्षाप्रमाणे यंदाही पाऊस वार्षिक सरासरी ओलांडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात चाळीसगाव, भडगाव तालुक्यात सर्वाधिक पर्जन्यमान असून, बाेदवड तालुक्यात सर्वात कमी पाऊस यंदा झालेला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now