⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | हवामान | Rain Alert ! पुढचे दोन दिवस मुसळधार पाऊस, जळगावसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट

Rain Alert ! पुढचे दोन दिवस मुसळधार पाऊस, जळगावसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२२ । मागील काही दिवसापासून प्रतीक्षेत मान्सून (Monsoon) महाराष्ट्र्रात (Maharahstra) दाखल झाला आहे. पुढच्या तीन ते चार दिवसात मान्सून राज्याच्या इतर भागात देखील सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यापूर्वी राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मान्सूनची वाटचाल योग्य दिशेने होत असल्याने जळगावसह (Jalagaon)अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. इतकंच नाही तर पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. Rain Update News in Jalgaon

हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आणि मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, धुळे तर मराठवाडा विभागातील जालना, बीड, परभणी, औरंगाबाद, नांदेड या जिल्ह्यात तर विदर्भातील बुलढाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

दरम्यान, मागच्या वर्षी मान्सून 7 जूनला तळकोकणात दाखल झाला होता. तर यावर्षी महाराष्ट्रात यायला मान्सूनला तीन दिवस उशीर झाला आहे. यंदा 29 मे रोजीच केरळात आगमन झालेल्या मान्सूनचा पुढे प्रवास खडतर झाल्याने राज्यात मान्सूनचे आगमन होण्यास उशिर झाला होता. आगमनानंतर दोनच दिवसांमध्ये केरळ राज्य आणि कर्नाटक किनारपट्टी व्यापून टाकल्याने राज्यातही दणक्यात आगमन होणार असे वाटत असतानाच मान्सूनचा वेग मंदावला होता. गेल्या आठवड्याभरापासून अरबी समुद्रापासून मान्सूनची प्रगती झाली नव्हती. त्यामुळे राज्यात मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले होते.मात्र शुक्रवारी मान्सून कोकणात दाखल झाला आहे.

मान्सून तळकोकणात दाखल आल्यामुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यात देखील काल सायंकाळी पावसाचे ढग दाटून आले होते. मात्र पावसाने हुलकावणी दिली. मात्र जिल्ह्यातील काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सारी कोसळल्या आहे. दरम्यान, जळगावसह राज्यातील विविध भागात पुढचे दोन दिवस मेघगर्जनेसह, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली. त्यामुळे या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला असून पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.