राज्यात ४ ते ५ दिवसांत पाऊस पुन्हा कमबॅक करणार

ऑगस्ट 11, 2021 8:35 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२१ ।  राज्यात महापुराच्या परिस्थिती नंतर दडी मारली आहे. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवलं. पण आता मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. राज्यात येत्या चार ते पाच दिवसात हलका ते मध्यम पाऊस पडणार अशी माहिती के.एस.होसाळीकर यांनी दिली आहे.

rain 2

खरंतर, गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, कोकण, विदर्भ आणि सर्वदूर भीषण परिस्थिती ओढावली होती. मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. पण सध्या जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारली आहे. पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस सुरू आहे.

दरम्यान, एकीकडे राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील काही भागावर दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला तरी देखील जिल्ह्यात अद्यापही मुसळधार पावसाने हजेरी लावली नाहीय. त्यामुळे पिकांनी मान टाकली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जनावरांना चारा देखील मिळत नाहीये. आता पाऊस पडला तरी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटेल.  बळीराजाचा चालू वर्षाचा खरीप हंगाम पूर्णपणे कोलमडला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now