जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२१ । जळगाव जिल्ह्यातील विविध भागात गेल्या दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मुसळधार ते काही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान, आज गुरुवारी भुसावळ शहरासह परिसरात दुपारी ३ वाजेच्या तर रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जाेरदार पावसाच्या सरी बरसल्या. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
राज्यातील विविध भागात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. दरम्यान, मागील काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी अडचणीत आला होता. शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचं संकट आले होता. परंतु जळगाव जिल्ह्यात मागील गेल्या दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून दुबार पेरणीच संकट टळले आहे.
आज दुपारी भुसावळ शहरासह परिसर दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले. तर रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास पुन्हा पावसाने कडकडाटासह जोरदार हजेरी लावली असल्याने शेतकरी सुकवला आहे. दरम्यान, पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.