जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२३ । सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र गेल्या महिन्याच्या अखेरीस पावसाने जोरदार आगमन केलं. मागील काही दिवसापासून राज्यातील अनेक भागाला पावसाने झोडपून काढलं आहे. यामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात पावसाचा जोर आणखी काही दिवस राहणार असून अशातच हवामान खात्याने काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अन् यलो अलर्ट दिला आहे. या सर्व जिल्ह्यांसाठी पुढचे 48 तास महत्वाचे आहे. राज्य शासनाने आपात्कालीन परिस्थितीसाठी यंत्रणा तयार ठेवली आहे.
या जिल्ह्यांना रेड अलर्ट?
पुणे , पालघर , ठाणे ,रायगड , या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना आँरेज अलर्ट
मुंबई आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
यलो अलर्ट :
सिंधुदुर्ग , सातारा , नाशिक , नंदुरबार , कोल्हापूर ,भंडारा , अकोला , अमरावती , बुलढाणा , चंद्रपूर , गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
जळगावात कशी राहणार स्थिती?
दरम्यान मागील दोन दिवसापूर्वी पावसाने जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये जोरदार हजेरी लावली त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला होता. गुरुवारी जिल्ह्यात दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र रात्री काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह तुरळक सुरु कोसळल्या. आज पहाट पासून ढगाळ वातावरण असून जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.