---Advertisement---
हवामान

बळीराजांवर पुन्हा अवकाळीचे संकट : हवामान खात्यांचा नवा अंदाज, जळगावलाही अलर्ट जारी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२३ । राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका वाढत असताना हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात काही ठिकाणी तुरळक, हलका पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या गडगडाटसह वादळी पावसाची शक्यता आहे. त्यानुसार आज अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्याला देखील आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.

rain jpg webp

चक्रीय वार्‍याची स्थिती सक्रिय झाल्याने देशातील काही राज्यांसह महाराष्ट्रात देखील अवकाळीचे सावट निर्माण झाले आहे. के.एस.होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज (दि. ७) पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेडला आज ऑरेंज अलर्ट (Weather Forecast देण्यात आला असून, मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्हयात ढगाळ वातावरण असल्याची माहिती देखील भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

---Advertisement---

नागरिकांनो काळजी घ्या! IMD कडून एप्रिल महिन्यातील अंदाज जाहीर

जळगाव जिल्ह्याला देखील आज (शुक्रवार) आणि उद्या (शनिवार)साठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज पहाटपासूनच जिल्ह्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण होते. तसेच ढगांचा गडगडाट सुरु होता. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सुरु कोसळल्या. दरम्यान, जिल्ह्यातील उन्हाचा पारा ४० अंशापर्यंत जात आहे. अवकाळीबरोबर तापमानात दिलासा मिळण्याची शक्यता नाही.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---