⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

Rain Alert : पुढचे 3 दिवस राज्यात मुसळधार, जळगावात ‘या’ दिवशी अतिवृष्टीची शक्यता

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२२ । राज्यात दोन आठवड्यांच्या ब्रेकनंतर पावसाने पुन्हा एन्ट्री मारली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, अशातच आजपासून पुढचे 3 दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तविला आहे. तसेच मंगळवार आणि बुधवारी जिल्ह्यात अतिवृष्टी हाेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Rain Alert In Maharashtra

राज्यात जून महिन्यात उघडीप दिल्यानंतर गेल्या जुलै महिन्यात दमदार हजेरी लावली होती. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. मागच्या दोन आठवड्यापासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. आजपासून पुढचे 3 दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. मुंबईसह, ठाणे, कोकणामध्ये हवामान खात्याने हायअलर्ट जारी केला आहे. तसंच, पुण्यातही अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सरीकडे कोल्हापूरसाठी आजच्या दिवसासाठी रेड अलर्ट आणि पुढच्या दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सातारा जिल्ह्यासाठी आज आणि उद्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर त्यापुढच्या तीन दिवसांसासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

दरम्यान, हवामान विभागाकडून मंगळवार आणि बुधवारी जिल्ह्यात अतिवृष्टी हाेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.