⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ; महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२२ । शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी एक बातमी आहे. ऐन हिवाळ्यात आणि त्यातच कडाक्याची थंडी पडलेली असतांना पुणे हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविली आहे. महाराष्ट्रात 15 डिसेंबरपर्यन्त कधीही पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. Rain Alert In Maharashtra

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हवामान विभागाने याला मंदोस चक्रीवादळ असे नाव दिलेय. या चक्रीवादळाचा फटका दक्षिणेकडील राज्यांना जास्त बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. 

पुणे हवामान विभागाने पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. 11 ते 14 डिसेंबर या कालावधीत राज्यात पावसाची शक्यता अधिक आहे, त्यामुळे द्राक्ष उत्पादक, कांदा उत्पादक, गहू उत्पादक यांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शेतमालाचे नुकसान झाल्यानंतर मिळालेली तोकडी नुकसान भरपाई, आणि त्यात पुन्हा ऐन हिवाळ्यात पाऊस तोही शेतमाल हाताशी आलेले असतांना त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.