---Advertisement---
हवामान

IMD Alert : पुढचे चार दिवस राज्यात पावसाचे, जळगावमध्ये कशी राहणार पावसाची स्थिती?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२२ । सध्या बंगालच्या उपसागरापासून ते आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीपर्यंत हवेच्या वरच्या भागात द्रोणीय स्थिती तयार झाली होती. त्यामुळे राज्यात पाऊस सक्रिय झाला आहे. दरम्यान पुढे चार दिवस राज्यातील विविध भागाला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यात जळगावसह उत्तर महाराष्ट्रात चार दिवस पावसाचा मुक्काम राहणार आहेत. त्यामुळे पीकांना माेठा दिलासा मिळेल. Rain Update News Maharashtra

rain 1 jpg webp

राज्यात गेल्या यंदा जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाने हजेरी लावली. गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. मागील काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. दरम्यान पुढे चार दिवस राज्यातील कोल्हापूर, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, मुंबई, नाशिक, ठाणे, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागांना अलर्ट’ जारी केला आहे.

---Advertisement---

तसेच जळगावसह उत्तर महाराष्ट्रात चार दिवस पावसाचा मुक्काम राहणार आहेत. जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी मारली होती. पावसाने उघडीप दिल्याने उकाडा काहीसा वाढला होता. मात्र गुरुवारी जिल्ह्यात पावसाचे दमदार पुनरागमन झाले. काल शुक्रवारी रात्री जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. मंगळवारपर्यंत जिल्ह्यात पावसाचा मुक्काम असणार आहे.

जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ३३३.८ मिलिमीटर पावसाची नाेंद करण्यात आली. अमळनेर, मुुक्ताईनगर, चाेपडा आणि पाचाेरा या तालुक्यात पर्जन्यमान अधिक चांगले आहे. जिल्ह्यात मध्यम अाणि माेठ्या प्रकल्पांत मुबलक जलसाठा असला तरी लघु प्रकल्प, पाझर तलाव, बंधाऱ्यांत मात्र अपेक्षीत जलसाठा नाही. भूजलपातळी वाढण्यासाठी लघु प्रकल्पांत जलसाठा असणे अावश्यक आहे. मात्र, अपेक्षित पाऊस नसल्याने लहान प्रकल्प अजुनही काेरडेठाक आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---