आज ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट ; जळगाव जिल्ह्यात कशी असेल पावसाची स्थिती?

सप्टेंबर 13, 2022 11:04 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२२ । राज्यात काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने उकाड्यानं अंगाची लाही लाही होत होती. मात्र अशातच पुन्हा एकदा वरुणराजानं कृपा करत बरसण्यास सुरुवात केल्यानं उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार, दक्षिण ओदिशाच्या किनारपट्टीभागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. पुढचे चार पाऊस राज्यात थैमान घालण्याची शक्यता आहे.

rain jpg webp

आज या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट?
आज मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, पुणे, नाशिक घाट भागात पुढील काही तासांत अधूनमधून जोरदार सरींसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो जारी करण्यात आला आहे.

राज्याच्या काही भागांत जोरदार सुरूच राहणार आहे. राज्याच्या काही भागांत 16 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर काही भागांत पावसाचा जोर कमी होणार आहे. दरम्यान, वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात गेल्या आठ दिवसांपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात देखील पावसाने मुसळधार हजेरी लावली आहे. काल सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. रात्री जळगाव शहरात जवळपास ५१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. यापूर्वी ५ जुलै रोजी सर्वाधिक ७३ मिलीमीटर पाऊस झाला होता. पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यापासून जळगावकरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आज जळगाव जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जळगांव जिल्हा
दि13/ 9/2022
अमळनेर-9
बोदवड-5
भडगाव-28
भुसावळ-3.8
पाचोरा-50
पारोळा-2
जामनेर-28
चोपडा-12
चाळीसगाव-18
रावेर-16
मुक्ताईनगर-15
धरणगाव-9
यावल-35.5
एरंडोल-3
जळगाव-4.2

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now