⁠ 

जळगावात ढगाळ वातावरण ; हवामान खात्याने वर्तविला ‘हा’ अंदाज

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२२ । राज्यात गेल्या पंधरा दिवसापूर्वी मुसळधार पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं. दोन तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील काही भागात पावसाची रिपरिप सुरु आहे. जळगाव मंगळवारी दिवसभर जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण होता. दरम्यान, आज बुधवारी जळगाव शहरासह तालुक्यात हलक्या तर गुरुवारी रिमझिम पावसाची शक्यता हवामान खात्यातर्फे व्यक्त केली आहे

गेल्या काही दिवसात राज्यासह जळगाव जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग होत आहे. तसेच शेतकरी देखील सुखावला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ९२ गावांत बुधवार व गुरुवार या दोन दिवस ढगांनी झाकोळलेले वातावरण राहील. हलका व रिमझिम मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शहरात दोन दिवसांत अनुक्रमे हलक्या स्वरूपाच्या पावसाची ८२ तर रिमझिम पाऊस पडण्याची ४८ टक्के शक्यता आहे. तालुक्यातील गावांमध्ये हलका व रिमझिम पाऊस पडण्याची ४४ ते १०० टक्के शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

दरम्यान, आज हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून १४११०६ क्यूसेस पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आला आहे.तर दुसरीकडे गिरणा धरणाचे ४ दरवाजे उघण्यात आले आहे. यामुळे नदी पात्रात न जाण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.