⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | नोकरी संधी | 10वी/12वी पाससाठी खुशखबर! रेल्वेत टीसी पदाच्या 11200+ जागांसाठी भरती, असा करा अर्ज

10वी/12वी पाससाठी खुशखबर! रेल्वेत टीसी पदाच्या 11200+ जागांसाठी भरती, असा करा अर्ज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ। रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. विशेष दहावी आणि बारावी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे. रेल्वे भरती मंडळाने तिकीट तपासणीस(TC) पदासाठी भरती सुरु आहे. या भरतीद्वारे तब्बल ११२५५ पदे भरण्यात येणार आहे. यासाठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या नोकरीबाबत अधिसूचना या महिन्याच्या अखेरपर्यंत देण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला अर्ज करता येणार आहे.

रेल्वे भरती मंडळाने याबाबत कोणतीही अधिसूचना जाहीर केलेली नाही. परंतु या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. तर ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्षांची सूट देण्यात येईल.

भरतीसाठी पात्रता काय असणार?
या भरती अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी विज्ञान, वाणिज्य, कला शाखेतून पदवी प्राप्त केलेली असणे गरजेचे आहे.

निवड कशी होईल?
या नोकरीसाठी तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात येईल. त्यानंतर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. यानंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणी घेण्यात येईल. नंतर मुलाखतीचा राउंड होईल. या फेऱ्यांमध्ये पास झालेल्या उमेदवाराची या नोकरीसाठी निवड करण्यात येईल.

अर्ज शुल्क किती लागेल?
या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडून शुल्क आकारले जाईल. सामान्य, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकडून ५०० रुपये फी घेतली जाईल. तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांकडून २५० रुपये फी घेतली जाईल.

तुम्हाला किती पगार मिळेल : तिकीट तपासणीस या नोकरीसाठी तुम्हाला २५००० ते ३४,४०० रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.