तरुणांसाठी गुडन्यूज। रेल्वेत तब्बल 32,438 रिक्त पदांसाठी भरती
जळगाव लाईव्ह न्यूज । रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) ने ग्रुप डी पदांसाठी भरती सुरु केली आहे, ज्यामध्ये 32,438 रिक्त पदांसाठी अर्ज मागविले आहेत. ही भरती लेव्हल 1 पदांसाठी असून, विविध विभागांमध्ये होणार आहे.
अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा
रेल्वे ग्रुप डी पदांसाठी अर्ज प्रक्रिया 23 जानेवारी 2025 रोजी सुरु होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी मिळणार आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.
पदे आणि रिक्त जागा
या भरती प्रक्रियेत विविध पदांसाठी जागा रिक्त आहेत. पॉइंट्समॅन बी पदासाठी 5058 जागा, असिस्टंट इंजिनियर पदासाठी 799 जागा, ट्रॅक मेनटेनर पदासाठी 13187 जागा आणि मेकिनल विभागातील विविध पदांसाठीही भरघोस जागा रिक्त आहेत. इलेक्ट्रिकल असिस्टंट पदासाठी 1381 जागा रिक्त आहेत.
शैक्षणिक पात्रता :
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किसी मान्यता प्राप्त बोर्डाची 10वी परीक्षा उत्तीर्ण झालेली असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी NCVT चे सर्टिफिकेट असणेही गरजेचे आहे. उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 33 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे, परंतु आरक्षित वर्गांसाठी नियमानुसार वयात छूट दिली जाईल.
अर्ज शुल्क : सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ₹500, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ₹250 भरावे लागणार आहे.
चयन प्रक्रिया
उमेदवारांची निवड कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) द्वारे केली जाईल. CBT मध्ये पास झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी, शारीरिक दक्षता परीक्षण (PET) आणि अंतिम टप्प्यात मेडिकल परीक्षण केले जाईल.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. अर्ज करताना फोटो, स्कॅन केलेले आवश्यक कागदपत्र अपलोड करावे लागतील. रेल्वेमध्ये नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी वाया जाऊ देऊ नका. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत आणि या सरकारी नोकरीचा लाभ घ्यावा.