जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२२ । शहरातील नवीन सम्राट कॉलनी परिसरात एक महिला स्वतःच्या घरात कुंटणखाना चालवत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाला मिळाली होती. बुधवारी पथकाने दुपारी छापा टाकला असता कुंटनखाना खाना चालवणारी महिला व दलाल महिलेला अटक करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील नवीन सम्राट कॉलनी परिसरात एक महिला स्वतःच्या घरामध्ये एका खोलीत कुंटणखाना चालवत होती. सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. कुमार चिंता यांच्या सूचनेनुसार बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला. पथकातील एका कर्मचाऱ्याने अगोदर जाऊन घटनास्थळ कुठे आहे याची खात्री केली. त्यानंतर एक पंच बोलावून त्याला बनावट ग्राहक म्हणून दुपारी ४ वाजता त्याठिकाणी पाठविले.
सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक रविंद्र गिरासे, महिला कर्मचारी मालती वाडीले, अर्चना पाटील, राजश्री बाविस्कर, सुनील पाटील, किरण धमके, रविंद्र मोतीराया, मीनल साकळीकर, महेश महाले यांनी ४.३० च्या सुमारास छापा टाकला. घरात कुटंनखाना चालविणाऱ्या महिलेसह बनावट ग्राहक आणि आणखी २ महिला मिळून आल्या. पोलिसांनी विचारपूस केली असता एक महिला कुंटनखाना मालकीण होती तर दुसरी कमिशन घेणारी दलाल महिला होती. घरातून एका पीडित महिलेची पोलिसांनी सुटका केली.
स्वतःच्या घरातील खोली वापरण्यासाठी मालकीण महिला प्रति गिऱ्हाईक ५०० रुपये घेत होती तर गिऱ्हाईक आणून देणाऱ्या महिलेला ५०० रुपये कमिशन देत असल्याचे तिने सांगितले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.