भुसावळ येथील सेंट अलॉयसियस हायस्कूलचा विद्यार्थी पूर्वेश नेवे याचे दहावीत यश

मे 8, 2026 6:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेत भुसावळ येथील St. Aloysius High School चा विद्यार्थी पूर्वेश नितीन नेवे याने 87 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

purvesh neve

पूर्वेशने गणित विषयात ९५, सामाजिक शास्त्रात ९२ तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विषयात ९० गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली. त्याच्या या यशामागे सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.

विशेष म्हणजे, पूर्वेशला विजय तेजवानी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या योग्य नियोजन, अभ्यास पद्धती आणि प्रेरणेमुळे पूर्वेशने हे यश मिळविल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.पूर्वेशच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच मित्रपरिवार यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. तसेच भविष्यातही तो शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.या यशामुळे नेवे कुटुंबात आनंदाचे वातावरण असून, परिसरातून पूर्वेशवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now