जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२२ । एरंडोलतालुक्यातील कासोदा पाणीपुरवठा योजनेची फिल्टर बेडचे वाश वॉटर काढण्यासाठी ची व्यवस्था पूर्ण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ठेकेदाराने सदरचे काम कमी दराच्या कारणास्तव केले नसल्याने या कामाची स्वतंत्र निविदा काढून ते काम करण्यात येत आहे. महिन्याभरात सदर काम पूर्ण होईल व दिवाळीच्या सणाच्या आधी कासोदा गावाला स्वच्छ शुद्ध व निर्जंतूक पाणीपुरवठा होणार अशी माहिती एरंडोल जीवन प्राधिकरण विभागाचे उपविभागीय अधिकारी पीव्ही मनुरे व शाखा अभियंता एसजी तडवी यांनी दिली.
कासोदा गावातील पाणी वितरण व्यवस्थेसाठी ४९८ लक्ष किंमतीची योजना मंजूर असून या योजनेची निविदा मंजूर झाली आहे सदरचे काम आठवडाभरात चालू होणार आहे संपूर्ण गावात सुमारे २४ किलोमीटर लांबीची नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार आहे त्यामुळे पाण्याच्या वितरणातील सर्व त्रुटी दूर होतील असे सांगण्यात आले. कासोदा गावाच्या ११ कोटी ४१ लाखाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम १९७१ साली सुरू झाले या योजनेचे उद्भव अंजनी धरणात आहे तेथून सुमारे नऊ किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात आली आहे या वाहिनी द्वारे सदरचे पाणी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाते हे पाणी गावात नव्याने बांधलेल्या तीन जलकुंभ व एक जुना जलकुंभ अशा एकूण चार जलकुंभाद्वारे गावात पाणी वितरित केले जाते.