⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२। फैजपूर शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असला तरी शहरातील काही भागांमध्ये अनेक नळांना तोट्या नाहीत. त्यामुळे गटारीमधून पाणी वाहून वाया जाते. या प्रकारास आळा घालण्यासाठी नगरपालिकेकडून जनजागृती सुरू आहे. तरीही उपयोग न झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

शहराच्या झपाट्याने झालेल्या विस्तारामुळे लोकसंख्येत वाढ होऊन विविध नवीन रहिवासी वस्त्या अस्तित्वात आल्या आहेत. त्यामुळे पाणी समस्या निर्माण होऊ नये यासाठी सहा-सात वर्षांपूर्वी पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या ठिकाणी पाणी साठवण्यासाठी डॅम बनवण्यात आला. त्यातून शहरात आठ वर्षापासून दिवसाआड सुरळीत पाणीपुरवठा होते. मात्र, पाण्याची नासाडी टाळण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.