जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावमार्गे पुण्यासाठी विशेष गाडी धावणार आहे. वाढत्या उन्हाळी गर्दीचा विचार करून मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे ते गाझीपूर सिटी दरम्यान, द्विसाप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष या गाडीला जळगाव रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा देण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यासह परिसरातील प्रवाशांना फायदा होणार असून, पुणे जाण्यासाठी सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला आहे.

०१४३१ ही पुणे–गाझीपूर सिटी विशेष रेल्वे गाडी १७ ते २८ एप्रिल या कालावधीत दर मंगळवार आणि शुक्रवारी पुणे स्थानकावरून सकाळी ६.४० वाजता सुटेल. नियोजित वेळेनुसार ही गाडी दुपारी ३.२३ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचेल. येथे प्रवाशांसाठी चढ-उताराची सुविधा देऊन गाडी पुढे गाझीपूरकडे रवाना होईल.

परतीच्या प्रवासात ०१४३२ गाझीपूर सिटी–पुणे विशेष रेल्वे गाडी १९ ते ३० एप्रिल दरम्यान दर रविवारी आणि गुरुवारी पहाटे ४.२० वाजता गाझीपूरहून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ६.५० वाजता जळगाव स्थानकावर येईल आणि त्यानंतर पुण्याला (हडपसर) दुपारी ४.२० मिनिटाने पोहोचेल.
या विशेष सेवेअंतर्गत एकूण आठ फेऱ्या (चार अप आणि चार डाउन) चालविण्यात येणार आहे.या गाडीमुळे जळगाव जिल्ह्यासह खान्देश भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, उन्हाळी प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
डब्यांची रचना आणि स्थानकांवरील थांबे
या ट्रेनमध्ये एसी सेकंड क्लास, एसी थर्ड क्लास, स्लीपर क्लास आणि जनरल क्लाससह एकूण १८ डबे असतील, ज्यामुळे सर्व वर्गांतील प्रवाशांना सोयीस्कर होईल. ही ट्रेन मार्गावरील दौंड, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, खांडवा, पिंपरीया, नरसिंहपूर, मदन महाल, कटनी जं, सतना, माणिकपूर, प्रयागराजमी वाराणसी, जौनपूर, अनरीहार जं, स्थानकांवर थांबेल.







