जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२३ । अमळनेर शहरातील शनी मंदिराजवळ पुजार्याला डंपरने धडक दिल्याने मृत्यू झाला. हा अपघात बुधवार, 14 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास झाला. बोरी नदीच्या फरशी पुलावर हा अपघात घडला.
अपघात प्रकरणी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या अपघातात शनी मंदिराचे पूजारी मनोज वासुदेव उपासनी (47) यांचा मृत्यू ओढवला. पूजारी उपासनी हे दुचाकी (एम.एच.03 बी.जी.0912) बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास फरशी पुलावरून जात असताना पाठीमागून आलेला भरधाव डंपर (एम.एच.11 ए.एल.5783) ने त्यांना धडक दिली. यावेळी उपासनी याची मोटरसायकल डंपरच्या चाकात अडकूलीय.
ते सुमारे 60 मीटरपर्यंत फरफत् गेले व पुलावरील फुटपाथच्या दगडाचा मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. आशुतोष प्रसाद उपासनी यांनी अमळनेर पोलिसात तक्रार दिल्यावरून डंपर चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.