⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | महामार्गावरील अतिक्रमणकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

महामार्गावरील अतिक्रमणकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२२ । अमळनेर तालुक्यातील मौजे जानवे येथे प्लॅट नंबर ३६ याचा ग्राम पंचायत घर नं ८४७/२ च्या उत्तरेकडील सार्वजनिक वापराच्या रस्त्यावर सुनील भगवान पाटील हा बांधकाम करून सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत धुळे – अमळनेर महामार्गाच्या रस्त्यावर अतिक्रमण करीत घर बांधत आहे.

त्यामुळे यावर योग्य ती कारवाई करून सार्वजनिक वापराच्या रस्त्यावर केलेले बांधकाम हटवावे व तमाम जनतेच्या वापरास रस्ता मोकळा करावा व वापराच्या अधिकारास बाधा येणार नाही याविषयी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी तक्रार दिपक भटू पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह