चाळीसगावात एसटी कर्मचारी संपास मनसेचा जाहीर पाठिंबा

नोव्हेंबर 10, 2021 11:41 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२१ । राज्य परिवहन मंडळ चाळीसगाव आगार एसटी कर्मचारी संपास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मा. राज ठाकरे यांच्या आदेशन्वये आज दुपारी आंदोलनस्थळी आंदोलनकर्त्यांना भेट देऊन प्रसिद्धीपत्रकाद्वारे पाठींबा देत राज्य शासनात विलनिकरण करून कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सोयी-सवलती, वेतन, भत्ते, नियमाप्रमाणे लागू करण्यात यावे, या सर्व कर्मचारी यांच्या मागणीसाठी चाळीसगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे पाठींबा देण्यात आला.

Untitled design 35 jpg webp

यांची उपस्थिती होती 

मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ, जिल्हा सचिव श्री विलास बडगुजर, मनसे तालुकाध्यक्ष श्री संग्राम भाऊ शिंदे, मनसे शहर प्रमुख श्री आण्णा विसपुते, उपशहर प्रमुख पंकज स्वार, विभाग प्रमुख वाल्मिक पाटील, सरचिटणीस प्रवीण वजरे, माजी सैनिक आबासाहेब गुरड, प्रसिध्दी प्रमुख दिपक पवार, रस्ताअस्तापण तालुका अध्यक्ष भाईदास बोरसे, मनविसे शहर प्रमुख दर्शन चौधरी, कामगार सेना यशवंत चव्हाण, वाहतूक सेना भाऊसाहेब चौधरी, हर्षल जाधव तुषार देशमुख, कल्पेश सुतार, शाम पाटील, जितेंद्र देसले, आबा भुवर, बबलु महाजन तुषार पाटील हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थिती होते.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now