⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | नोकरी संधी | मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ खात्यात लवकरच 10,127 पदांची मेगाभरती, मंत्र्यांची घोषणा

मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ खात्यात लवकरच 10,127 पदांची मेगाभरती, मंत्र्यांची घोषणा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२२ । कोरोना महामारीमुळे अनेक भरती प्रक्रिया रखडली गेली. राज्यातील बहुतांश खात्यांमध्ये अनेक रिक्त पदे आहेत. मात्र आता कोरोना संकट कमी झाले असून लवकरच भरती प्रक्रिया राबविली जाऊ शकते. अशातच राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण 10,127 जागांसाठी मेगाभरती होणार आहे, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. 

या मेगाभरतीमध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, लॅब टेक्निशियन अशा अनेक पदे भरली जाणार असल्याची माहितीही महाजन यांनी दिली आहे. या पदभरती संदर्भातील ऑफिशिअल नोटिफिकेशन लवकरच जरी करण्यात येणार आहे अशीही माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. दरम्यान, जे विद्यार्थी वर्षानुवर्षे आरोग्य विभागाच्या परीक्षांसाठी किंवा सरकारी नोकरीसाठी वाट बघत आहेत अशा उमेवारांना या भरतीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. 

या भरतीच्या संभाव्य तारखा
पदभरतीच्या एकूण जागा – 10,127
ऑफिशिअल नोटिफिकेशन जारी होण्याचा कालावधी – 01 जानेवारी 2023 – 07 जानेवारी 2023
परीक्षांची तारीख – 25 मार्च 2023 आणि 26 मार्च 2023
निकाल जाहीर होण्याचा कालावधी -27 मार्च ते 27 एप्रिल 2023

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.