डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात संकल्प मानसोपचार व व्यसनमुक्ती केंद्रात सुविधा उपलब्ध
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२४ । भास होताय…आत्महत्येचा विचार…बडबडणे….कानात आवाज येताय…मारपिट करणे….नैराश्य …. झोप न येणे ही लक्षणे आहेत मानसिक विकारांची. अशा मानसिक विकारांवर आता ठाण्याच्या धर्तीवर मानसोपचार रूग्णालय सुरु झाले आहे.
आता डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात संकल्प मानसोपचार व व्यसनमुक्ती केंद्रात आता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत अगदी मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात गरजू रूग्णांसाठी विविध शासकीय योजना उपलब्ध आहेत. या योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मोफत उपचाराचा लाभ मिळवून दिला जातो.
मानसिक विकार असलेल्या रूग्णांना उपचारासाठी मोठा खर्च करावा लागत होता. आता मात्र डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयाच्या मानसोपचार विभागामार्फत मानसिक आजार जडलेल्या रूग्णांवर महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार केले जाणार आहेत. यामध्ये ईसीटी म्हणजेच शॉक ट्रीटमेंट, आरटीएमएस, समुपदेशन, बुध्दीची चाचणी या सुविधा रूग्णांसाठी आहेत. तसेच रूग्णालयात उपचारासाठी भरती होणार्या रूग्णांसाठी मोफत औषधोपचार आणि जेवणाचीही सुविधा उपलब्ध आहे. आवश्यक त्या तपासण्याही पॅकेजअंतर्गत केल्या जाणार आहेत. तरी मानसिक विकाराची लक्षणे असलेल्या रूग्णांना त्वरीत डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात उपचारासाठी भरती करण्यासाठी ९३०७६२२६९२ या क्रमांवर संपर्क साधावा असे आवाहन मानसोपचा विभागातर्फे करण्यात आले आहे.
अशी आहे तज्ञांची टीम
मानसोपचार विभागाचे प्रमुख डॉ. मयूर मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञ डॉ. विलास चव्हाण, डॉ. हुमेद महाडिक, डॉ. विकास गायसमुद्रे, डॉ. सौरभ भुतांगे, डॉ. आदित्य जैन, डॉ. उमा चांदूरकर, डॉ. हिमांशू जाधव अशी तज्ञांची टीम उपचारासाठी उपलब्ध आहे.