जळगाव शहर

बकर ईद साठी मनपाने सोयी सवलती उपलब्ध करून द्या : मुस्लिम शिष्ट मंडळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । 10 जुलै रोजी साजरी होणाऱ्या बकरी ईद निमित्ताने १० ते १२ जुलै या तीन दिवसात जळगाव शहरात मुस्लिम समाज बकरी ईद निमित्त कुर्बानी देत असतो. यासाठी मनपाने सोयी सवलती उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी मुस्लिम शिष्ट मंडळातर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना देण्यात आले आहे.

महानगरपालिकेने काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात कत्तलखाने ची परवानगी देण्यात यावी, जळगाव शहर मनपा हद्दीत एकही कत्तलखाना नाही. त्याचप्रमाणे कचराकुंड्या व घंटागाडी यांची स्वच्छता व टापटीप ठेवावी, तसेच आरोग्य विभाग, सॅनिटरी विभाग यांना सुद्धा योग्य त्या सूचना द्याव्यात व कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाही. यासाठी मुस्लिम समाजाला सहकार्य करावे. असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी नगरसेवक रियाज बागवान यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. शिष्ट मंडळात जळगाव जिल्हा मानियार बीरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, एम आय एम चे अध्यक्ष अहमद शेख,नगर सेवक प्रतिनिधी अक्रम देशमुख, एमआयएमचे महानगर अध्यक्ष दानिशअहमद, माजी अध्यक्ष झिया बागवान, मुस्लिम इदगाह ट्रस्टचे सहसचिव अनिस शाह, मरकज चे झूलकर नैन आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button