अभिमानास्पद : जळगावचा साई करणार देशाचे नेतृत्व

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२३ ।  जळगाव तालुक्यातील कुंभारी येथील साई प्रभाकर साळवे हा मुलगा देशाचे नेतृत्व करणार आहे. चौदाव्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी याची निवड झाली असून हि स्पार्धा काठमांडू येथे २६ रोजी ही स्पर्धा होणार आहे. (sai salwe jaglaon)

साई नेपाळ येथे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. साईने यापूर्वीही गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात सुवर्णपदक मिळवले आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर साळवे यांचा तो मुलगा आहे.

साईच्या निवडीबद्दल पंचक्रोशीतून त्याचे कौतुक होत आहे. या स्पर्धेत एकूण दहा देशांचा समावेश आहे. त्यात बांगलादेश, श्रीलंका, भूतान, नेपाळ, चीन आदी देश सहभागी होणार आहेत. साई सोळा वर्षांखालील गटात खेळणार असून, तो भारताला सुवर्णपदक आणण्यासाठी मेहनत घेत आहे. त्याचे शिक्षक आसिफ शेख यांचे साईला मार्गदर्शन मिळत आहे.