---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर महाराष्ट्र राजकारण

अभिमानास्पद ! जळगाव मनपा उत्तर महाराष्ट्रात ठरली ‘हायटेक’

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२३ । महापालिकेचे सर्व ठराव व कार्यवृत्त आता नागरिकांसाठी ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उत्तर महाराष्ट्रात जळगाव महापालिका ही एकमेव महानगरपालिका असून या महापालिकेने सर्व कार्यवृत्त व ठराव मनपाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे महासभेत कोणकोणते ठराव झाले व त्यात काय नमुद करण्यात आले हे थेट नागरिकांना घर बसल्या बघता येणार आहेत.

jalgaon mahanagar palika 2 jpg webp webp

जळगाव महापालिकेने सन २०१८ पासून ते २०२३ पर्यंतचे सर्व ठराव वेबसाईटवरला प्रसिध्द करण्यात आले आहे. हे ठराव अधिकारी, नगरसेवकांसह नागरिक घरबसल्या मोफत पाहू शकतात. महानगरपालिकेच्या कामात पारदर्शकता यावी, या साठी नगरसचिव सुनिल गोराणे यांच्या संकल्पनेतून महासभा व स्थायी समितीच्या सभेत झालेले ठराव वेबसाईडवर अपलोड करण्यात येत आहेत. त्यासाठी महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, आयुक्त, सर्व पक्षाचे गटनेते, नगरसेवक यांच्यासह नगरसचिव कार्यालयातील फहीम शेख, संदिप भावसार, प्रकाश सपकाळे, विजय देवरे, महेश जैस्वाल, अरविंद सूर्यवंशी व प्रकल्प विभागाचे अभियंता योगेश बोरोले यांचे सहकार्य त्यांना लाभले.

---Advertisement---

नगरसचिवाने अतिषय चांगल्या उद्देशाने ठराव वेबसाईडवर अपलोड करण्याचा निर्णय घेतला असून ४८ सभांचे कार्यवृत्त व ठराव वेबसाईडवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. सन २०१८ ते २०२३ दरम्यान, झालेल्या ५० सभांपैकी ४८ सभांचे ठराव पीडीएफ फाईलमध्ये उपलब्ध असून त्यास कोणीही सहज पाहू शकेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

मनपाच्या नगरसचिव कार्यालयाने केलेल्या कामाची दखल दि.७ जुलै रोजी झालेल्या महासभेत महापौर जयश्री महाजन यांनी घेतली असून नगरसचिव सुनिल गोराणे यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवून कौतूक केले. यावेळी सुनिल गोराणे यांनी सर्व पदाधिकारी, सदस्यांसह कार्यालयातील त्यांच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---