बहुजन मुक्ती पार्टीतर्फे फडवणीस यांचा निषेध
जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२२ । राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्य सेनानी हजरत टिपू सुलतान यांच्याबद्दल प्रजासत्ताक दिनी अपशब्द वापरले म्हणून त्याच्या निषेधार्थ बहुजन मुक्ती पार्टी, बहुजन क्रांती मोर्चा, छत्रपती क्रांती सेनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व बहुजन पार्टी जिल्हा अध्यक्ष अमजद रंगरेज, बहुजन क्रांती मोर्चा जिल्हा संयोजक राजेंद्र खरे, छत्रपती क्रांती सेना जिल्हा अध्यक्ष सुनील पाटील यांनी केले. आंदोलनात खान्देश प्रभारी सुमित्र अहिरे, महासचिव बहुजन मुक्ती पार्टी विजय सुकाळे, बहुजन मुक्ती पार्टी शहराध्यक्ष इरफान शेख, विषाल अहिरे, नितीन अहिरे, अक्षय तायडे, भारतीय विद्यार्थी मोर्चा घनश्याम वाडे, निलेश सपकाळे, महेश मोरे, रवींद्र वाडे जळगाव लोक सभा प्रभारी बहुजन मुक्ती पार्टी, गोपाळ कोळी, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. शकील शेख, भारत मुक्ती मोर्चा तालुका अध्यक्ष सुकलाल पेंढारकर, बहुजन मुक्ती पार्टी युवा अध्यक्ष विनोद अडकमोल उपस्थित होते.
हे देखील वाचा :
- तूरचा भाव प्रति क्विंटल 5 हजारांनी घसरला; शेतकऱ्यांना मोठा फटका
- Jalgaon : शेतीतून उत्पन्न नाही, कर्जफेडीची चिंता, घरात कोणी नसताना शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल
- जळगावात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन युवकांवर गुन्हा दाखल
- जळगावात चाकूचा धाक दाखवून वाइन शॉप चालकाला मागितली खंडणी; गुन्हा दाखल
- जळगावात ढगाळ वातावरणासह गारठा कायम; आगामी दिवस वातावरण कसे राहणार?