⁠ 
शनिवार, मे 4, 2024

मदरशांना अनुदान देण्यासाठी प्रस्तावांची होणार तपासणी

जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२२ । डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत पात्र मदरशांची शासनास अनुदानासाठी शिफारस करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती तपासणी करणार आहे. त्यानुसार पात्र मदरशांची शासनाकडे शिफारस करेल. त्यासाठी ११ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन २०२१-२२ अंतर्गत ज्या मदरशांमध्ये पारंपरिक धार्मिक शिक्षण देण्यात येत आहे. त्यासह विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू या विषयाचे शिक्षण देण्यात येत आहे. आधुनिक शिक्षणासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरशांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. मदरसा चालवणाऱ्या संस्था धर्मादाय आयुक्त किंवा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत पात्र मदरशांची शासनास अनुदानासाठी शिफारस करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनास प्रस्ताव सादर होणार आहे.

हे देखील वाचा :