प्रतिबंधित कापूस बियाणे जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२२ । प्रतिबंधित कापूस बियाणांची साठवणूक करणाऱ्या कंपनीवर कृषि विभागाने छापा टाकला. यात तब्बल ९३ हजार ७५० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी एमआयडीसीपोलिसांत दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
शिरसोली येथील इंद्रा सिड्स कंपनीच्या गोडावूनमध्ये बंदी असलेले कापूस बियाणांची साठवणूक केल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांना मिळाली. त्यानुसार जिल्हा गृह नियंत्रक निरीक्षक अरूण तायडे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी राऊत, मंडळ कृषी अधिकारी श्रीकांत झांबरे, पंच कृषी सहाय्यक अधिकारी कमलेश पवार, कृषी सहाय्यक अधिकारी भरत पाटील या पथकाने दि. ७ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला असता. सदर ठिकाणी बंदी असलेले एटीबीटी कापूस बियाणांच्या पाकीटाची साठवणूक आणि विक्री करत असल्याने शासनासह शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी पोलीसांनी बंदी असलेले एटीबीटी कापूस बियाणांचे ९३ हजार ७५० रूपये किंमतीचे ७४ पाकिटे जप्त करण्यात आले आहे. यावेळी कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांना शिरसोली गावाचे पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांच्यासमक्ष पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी जिल्हा गृह नियंत्रक निरीक्षक अरूण तायडे यांच्या फिर्यादीवरून प्रदीप शांताराम बैरागी रा. पाचोरा आणि इंद्रवदन संकाभाई पटेल रा. प्रल्हाद नगर, अहमदाबाद (गुजरात) यांच्या विरोधात विनापरवाना बंदी असलेले कापूस बियाणांची साठवणूक आणी विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.