गुन्हेजळगाव शहर

गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; तिघांना अटक, 61 सिलेंडर जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२५ । ग्राहकांच्या नावावर असलेल्या घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस मोटारीच्या साहाय्याने व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरून त्याचा काळाबाजार करणाऱ्या एका अड्ड्यावर शनिपेठ पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत तब्बल 61 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून, तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरुद्ध जीवनावश्यक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jL gas

जळगाव शहरातील आसोदा रोडवरील मोहन टॉकीज परिसरात घरगुती गॅसचा काळाबाजार होत असल्याची माहिती शनिपेठ पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली. त्यांनी मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पथकासह या ठिकाणी जाऊन कारवाई केली. या कारवाईत ३३ घरगुती आणि २८ व्यावसायिक गॅस सिलिंडर असे एकूण ६१ सिलिंडर जप्त केले. तसेच वजन काटा आणि गॅस ट्रान्सफर करण्यासाठी वापरली जाणारी इलेक्ट्रिक मोटार, वाहतूक करणारे वाहन जप्त केले.

राहुल नारायण सोनवणे (वय २९), राकेश नारायण सोनवणे (वय २५ दोन्ही रा. पिवळी भिंत, मोहन टॉकीज परिसर, जळगाव) व आदेश राजू पाटील (वय २३ रा. मोहन टॉकीज परिसर, जळगाव) यांच्यावर शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

असा केला जातो आहे गॅसचा काळाबाजार
घरगुती सिलिंडर ८५० रुपयांना येते. त्यात १४.५ किलो गॅस असतो. व्यावसायिक २१०० रुपयांना येते. त्यात १९.५ किलो गॅस असतो. व्यावसायिकमध्ये घरगुती १४.५ किलो गॅस भरून ते १४०० ला देतात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button