Raver : लाच घेताना मुख्याध्यापिकासह लिपिक एसीबीच्या जाळ्यात, शिक्षण क्षेत्रात खळबळ

जुलै 8, 2025 10:10 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२५ । रावेर तालुक्यातील खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयातील मुख्याध्यापिका आणि कनिष्ठ लिपिकास लाच घेताना ३६००० रुपयांची लाच घेताना धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

lach jpg webp

मनीषा पितांबर महाजन (वय 57 जनता शिक्षण मंडळ, धनाजी नाना विद्यालय, खिरोदा, रा. चिनावल रोड) असं मुख्याध्यापिकाचे नाव आहे तर आशिष यशवंत पाटील असं कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे. या कारवाईने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकार?
याबाबत असे की, तक्रारदार (वय 61 वर्षे) यांची सून धनाजी नाना विद्यालय, खिरोदा येथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. त्यांनी सुनेच्या प्रसूती रजा मंजुरीसाठी 02 जून रोजी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केला होता. मात्र, मुख्याध्यापिका मनीषा महाजन यांनी रजा मंजुरीसाठी तोंडी लाच मागणी केली होती. तक्रारदारांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापिकांची भेट घेतली असता त्यांनी प्रति महिना ₹5,000/- प्रमाणे सहा महिन्यांसाठी 30,000 रुपयाची मागणी केली.

मात्र यांनतर महाजन यांनी रकमेची वाढ करत प्रति महिना 6,000 प्रमाणे एकूण 36,000 रुपयाच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. यांनतर लाचलुचपत विभागाने सापळा रचत 07 जुलै 2025 रोजी आरोपींना रंगेहात पकडले. तक्रारदारांकडून लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर मुख्याध्यापिका सौ. महाजन यांनी ती कनिष्ठ लिपिक आशिष यशवंत पाटील (वय 27 वर्षे) यांच्याकडे मोजण्यास दिली. त्यावेळी आरोपी क्रमांक 2 हा रक्कम मोजत असताना दोघांनाही रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सापळा कारवाईनंतर आरोपींच्या घरी झडती घेण्यात आली असून मोबाईल ताब्यात घेऊन त्याचा तपास सुरू आहे. आरोपींचा मोबाईल तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे आणि त्यातील डिजिटल पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. संबंधित गुन्ह्याचे साक्षीपुरावे म्हणून हॅश व्हॅल्यू देखील घेण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now