---Advertisement---
जळगाव जिल्हा नोकरी संधी

जळगावात ‘प्रधानमंत्री नॅशनल ॲप्रेंटिसशिप (मेला)’ भरती मेळाव्याचे आयोजन

organizing job fairs online
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पकारागिर योजनेतील, व्यवसायातील प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना पंतप्रधान राष्ट्रीय शिकाउ उमेदवारी योजनेअंतर्गत आस्थापनामध्ये शिकाउ उमेदवारी प्रशिक्षण घेण्याकरीता ‘प्रधानमंत्री नॅशनल ॲप्रेंटिसशिप मेला’ भरती मेळावा शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था (ITI) जळगाव नॅशल हायवे नं.6 तंत्र निकेतन समोर जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.

organizing job fairs online

21 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 10 वाजता शिकाउ उमदवारी योजनेत निवड होण्याकरिता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्या करीता जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील नामांकित कंपन्या उपस्थित राहणार आहेत.

---Advertisement---

तरी प्रंतप्रधान राष्ट्रीय शिकाउ उमेदवारी योजनेअंतर्गत भरती मेळाव्यास भाग घेण्यासाठी संबंधित आस्थापना तसेच दहावी बारावी, शिल्प कारागिर योजना, डिप्लोमा, पदवीधीरक उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी Apprenticeshipindia.org या वेबपोर्टलवर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करून मा. पंतप्रधान राष्ट्रीय शिकाउ उमेदवारी योजनेअंतर्गत भरती मेळाव्यास उपस्थित राहुन ‘प्रधानमंत्री नॅशनल ॲप्रेंटिसशिप (मेला)’ भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार, मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र (BTRI) जळगाव यांनी केले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment