---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

Jalgaon : पाइप चोरी प्रकरणात सुनील महाजनांना कोर्टाचा दिलासा ; अटकपूर्व जामीन मंजूर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२५ । जळगाव शहराला (Jalgaon City) पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या पाइपलाइनचे पाइप चोरी प्रकरणात संशयित आरोपी तथा महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन (Sunil Mahajan) यांना उच्च न्यायालयाने (High Court) अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर केला असून यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.

sunil mahajan

खरंतर गिरणा पंपींग येथील ब्रिटीशकालीन पाणीपुरवठा योजनेतील जुने पाईप चोरी करून नेले जात असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात जळगाव मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्यासह काही जणांवर रामानंद नगर पोलीस ठाणे आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून सुनील महाजन हे फरार होते.

---Advertisement---

त्यांच्या शोधासाठी पोलीस उपअधिक्षक संदीप गावित यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. सुनील महाजन मिळून येत नसल्याने त्यांची मालमत्ता जप्तीची कारवाई प्रशासनाने सुरू केली होती. तर सुनील महाजन यांनी अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न केला असता जिल्हा न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला होता. यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, खंडपीठाच्या न्या.पेडणेकर यांच्या न्यायालयाने सुनील सुपडू महाजन यांना ७ दिवसांसाठी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पुढील कामकाज दि.४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. महाजन यांच्यातर्फे अँड.सागर चित्रे आणि अँड.राजेंद्र देशमुख यांनी काम पाहिले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---