जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२४ । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे ईद-ए-मिलाद निमित्त मौलाना तजमुल हुसेन यांच्यासह मुस्लिम समाज बांधवांचा जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी सत्कार केला आणि मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद च्या शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी सामाजिक सलोख्याचा संदेश देखील प्रतापराव पाटील यांनी दिला.
गणेशोत्सव असो की ईद-ए-मिलाद असो हे दोन्ही सण हिंदू- मुस्लिम बांधव एकत्र साजरी करत असल्याचे प्रतापराव गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले. सत्कार करतेवेळी GPS शाळा व महाविद्यालयाचे अध्यक्ष विक्रमदादा गुलाबराव पाटील आणि पाळधी पोलीस निरीक्षक ए. पी. कंडारे, पाळधी लोकनियुक्त सरपंच विजू बापू पाटील, माजी पंचायत समिती सदस्य कृष्णा साळुंखे, पन्नू गुजर, निसार देशमुख, अन्वर मेंबर, दानिश फिरोज खान, अलीम देशमुख, शयू खान, जाविद शेख, इम्रान हाजी, हमीद हाजी, सलीम हाजी, जाविद देशमुख, इभा शेख, नूर शेख आदी उपस्थित होते.