जळगाव लाईव्ह न्यूज । डिप्लोमामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने शेतात गळ@#फास लावून जीवनयात्रा संपवली.प्रणव महाजन (वय १८, रा. वेरुळी बुद्रुक, ता पाचोरा) असं मृत तरुणाचं नाव आहे. या घटनेनं कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून मृत प्रणवने टोकाचं पाउल का उचललं हे कळू शकले नाही.
पाचोरा तालुक्यातील वेरुळी येथील संजय महाजन यांना प्रणव हा एकुलता एक मुलगा होता. प्रणव हा जळगाव येथील गोदावरी कॉलेजला डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होता.

दरम्यान, सोमवारी ५ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास प्रणव हा शेतात जावुन येतो असे सांगुन घरून निघाला होता. दरम्यान काही वेळातच प्रणव याने शेतातील झाडाला दोरीच्या सहाय्याने गळ@# फास लावून आत्म#$ हत्येचे टोकाचे पाऊल उचलले. काही वेळानंतर प्रणव याचे काका विकास महाजन यांना सदरचा प्रकार लक्षात आला. या घटनेने कुटुंबियांना मोठा धक्का बसला परिसरात खळबळ उडाली.






