Jalgaon : प्रमोद वाणी यांची भाजप ऑटो स्कूल व्हॅन आघाडी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती..

ऑक्टोबर 18, 2025 3:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भाजपचा जळगाव महानगर जिल्ह्यातील ऑटो स्कूल व्हॅन आघाडी जिल्हाध्यक्षपदी प्रमोद वाणी यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली.

New Project 13

ही नियुक्ती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, प्रदेश महामंत्री विजय तौधरी, विभागीय संघटनमंत्री रविंद्र अनासपुरे, तसेच खा. स्मिता वाघ, आ. राजूमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण आणि आ. अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

पक्षाने दिलेल्या या जबाबदारीबद्दल प्रमोद वाणी यांचे सर्व स्तरांवर अभिनंदन होत आहे. त्यांनी आतापर्यंत पक्षाच्या संघटनात्मक कामात अनेक जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या असून, त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेतच पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे.कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या विश्वासाला ते न्याय देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. “राष्ट्र प्रथम, एकात्म मानवतावाद, अंत्योदय आणि मूल्याधारित राजकारण” या भाजपच्या विचारधारेवर आधारित राहून कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच पक्षशिस्त, संघभावना आणि परस्पर सहकार्य या त्रिसूत्रीचा अवलंब करून संघटन अधिक सक्षम करण्याचे वचनही दिले आहे.

या नियुक्तीमुळे भाजपच्या स्थानिक संघटनाला नवी ऊर्जा मिळाली असून, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा निर्धार पक्षाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

प्रमोद वाणी यांच्या नियुक्तीमुळे भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेला बळकटी मिळेल, तसेच पक्षाच्या कार्याचा व्याप वाढवून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now