जळगाव शहर

रायसोनीच्या विद्यार्थानी मेहरूण तलाव येथे गणपती विसर्जनस्थळी राबविला स्तुत्य उपक्रम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २००२२ । जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनिअरीग अॅन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील बीसीए व एमसीए विभागातील विध्यार्थ्यातर्फे अनंत चतुर्थी निमित्त मेहरूण तलावावर गणपती विसर्जनादरम्यान निर्माल्य संकलन करून त्याचे योग्य पद्धतीने विघटन करण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला भाविकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून, विविध संस्थांनी व भाविकांनी टाकलेले निर्माल्य मोठ्याप्रमाणात विद्यार्थ्यांनी संकलित केले.

जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. गणपती विसर्जनाला येणारे भाविक हे, बरोबर आणलेली व पूजेसाठी वापरलेली फुले, दुर्वा, फुलांचे हार, सत्यनारायण पूजेसाठी वापरलेले केळंबे, उदबत्या, कापूर सोबत आणतात. या सर्व संकलित झालेल्या निर्माल्यापासून खत तयार करण्यात येत असून तयार केलेले खत हे रोपवाटिकेसाठी वापरले जाते.

या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होत असल्याने, बहुतांश नागरिक स्वत:हून निर्माल्य विध्यार्थी कार्यकर्त्यांच्या स्वाधीन करत होते. तर काही नागरिकांनी तर या उपक्रमाला प्रभावित होत “आम्ही स्वता हे निर्माल्य आमच्या घराजवळील परसदारातील झाडांमध्ये टाकु असल्याचे सांगितले.

हा उपक्रम दिव्या पाटील, ममता पाटील, मोहित पाटील, प्राजक्ता थोरात, सपना पाटील, मयूर भोईटे, गौरव कोहली, दिनेश बाविस्कर, पवन देवरे, प्रिया पांडे, निशांत पाटील, धीरज बडगुजर, कृष्णा मराठे, सुशील पाटील, मोहिनी माळी, विशाल पवार, ज्ञानेश्वर हिवरे या विध्यार्थ्यानी राबविला तर या कार्यक्रमाचे समन्वय प्रा. विनोद महाजन व केतन जठाले यांनी साधले तर एमसीए विभागप्रमुख प्रा.रफिक शेख व बीसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे यांनी सहकार्य केले तर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले.

Related Articles

Back to top button