⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

महिन्याला केवळ 1 रुपयाची बचत करा, अन् 2 लाख रुपयांचे सुरक्षा कवच मिळवा

जळगाव लाईव्ह न्युज । १९ जुलै २०२२ । उच्च आणि मध्यमवर्गीय लोक बर्‍याचदा विमा घेतात, परंतु खालच्या वर्गातील लोकांना विम्याच्या प्रीमियमबद्दल खूप काळजी वाटते आणि यामुळे ते विमा काढू शकत नाहीत. परंतु जर तुम्हाला महिन्याला केवळ १ रुपया भरून २ लाख रुपयाचे सुरक्षा कवच मिळत असेल तर. होय हे खरं आहे. केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ (PMSBY) योजनेत तुम्हाला हा फायदा मिळेल. Pradhan Mantri Suraksha Bima Yojana

केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ (PMSBY) अंतर्गत, तुम्हाला महिन्याला १ रुपया म्हणजेच एका वर्षात 12 रुपये भरल्यास दोन लाख रुपयांपर्यंतचे अपघाती संरक्षण मिळेल. या योजनेंतर्गत दरवर्षी ३१ मे पूर्वी, तुमच्या बँक खात्यातून प्रीमियमची रक्कम आपोआप कापली जाईल. याशिवाय तुम्हाला १ जून ते ३१ मे दरम्यान कव्हर मिळेल. ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ (PMSBY) साठी, 18 ते 70 वर्षे वयोगटातील भारतीय नोंदणी करू शकतात.

वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ (PMSBY) मध्ये, विमाधारक व्यक्तीला रु.चा विमा मिळतो. एवढेच नाही तर या योजनेंतर्गत अंशतः दिव्यांग व्यक्तीला 1 लाख रुपयांचे कव्हर देण्याचेही सरकारने सांगितले आहे.

याप्रमाणे अर्ज करणे आवश्यक आहे
सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या या योजनेसाठी नोंदणी करणे देखील खूप सोपे आहे. ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ (PMSBY) च्या नोंदणीसाठी, तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करावा लागेल. तुम्ही ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ (PMSBY) च्या नोंदणीसाठी केवळ बँकेमार्फतच नाही तर बँक मित्रामार्फतही अर्ज करू शकता.